Sharad Pawar On Dhananjay Munde : सत्तेचा गैरवापर करणाऱ्यां लोकांना आवरायची वेळ आली आहे. समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही.पंतप्रधानांनी मणिपूरला जायची गरज होती. मणिपूरच्या जनतेचं दु:ख मोदींनी समजून घेतलं नाही.ठाण्याच्या रूग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. मात्र राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली.आजच्या सभेने जुन्या काळाची आठवण झाली. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता शरद पवार यांनी निशाणा साधला. नाद करा, पण साहेबांचा नको. माझं वय झालं म्हणायला तुम्ही माझं काय बघितलं? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आज बीडमध्ये स्वाभिमानी सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.यावेळी मणिपूरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मणिपूरच्या भगिनींच दु:ख मोदींनी समजून घेतलं नाही.भाजप स्थिर सरकार देण्याची घोषणा करतो मात्र,लोकांनी दिलेलं ,सरकार पाडतायेत. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या लोकांना आवरण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना पवार म्हणाले की,माझं वय झालं म्हणायला तुम्ही माझं काय बघितलं. तुम्हाला सत्तेच्या बाजूला जायचं तर जा.पण ज्यांच्या जिवावर तुम्ही निवडून आलात, त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवा. पण ते नाही केलं तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा नाव न घेता धनंजय मुंडे यांना दिला. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. भाजपाचा पराभव केला. त्यांचा पराभव घेऊन तुम्ही सत्तेत आलात आणि आज भाजपाच्या दावणीला बसायची भूमिका तुम्ही मांडत आहात.उद्या मतदान करण्यासाठी लोकांना मतदान केंद्रावर जायची संधी मिळेल,तेव्हा कोणतं बटण दाखवायचं आणि तुम्हाला कुठे पाठवायचं हा विचार मतदार केल्याशिवाय राहणार नाही. नाद करा, पण साहेबांचा नको,अस धनंजय मुंडेंना उत्तरही शरद पवार यांनी दिले.








