राष्ट्रवादी आता शरद पवारांकडे राहीली नाही अशी खोचक टिका करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढचा पंतप्रधान कोण हे विचारण्यासाठी दारोदारी फिरावे लागत आहे असा प्रतिटोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच राष्ट्रवादीतील आमदार निघून गेले म्हणजे राष्ट्रवादीचा जनाधार निघून गेला असे समजू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना तो पक्ष आता शरद पवारांचा राहीला नसल्याचे म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युतर दिले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे कि, “महाराष्ट्रात एकटे शरद पवार काफी है! राहुल गांधी यांना आणायची गरजच नाही. आमदार निघून गेले म्हणून जनाधार निघून गेला असा गैरसमज भाजपने करून घेऊ नये. तसे असते तर चंद्रशेखर बावनकुळे यांना दारोदारी फिरून पुढचा पंतप्रधान कोण असावा हे विचारायची वेळ आली नसती.” असे ते म्हणाले.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीवर महाविकास आघाडीमधील काँग्रेसकडून आलेल्या नावावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “समन्वय समितीसाठी कोणती नावे द्यावित हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. नाना पटोले आणि पक्षश्रेष्ठीजी नावे अंतिम करतील तीच चर्चेला येतील. तसेच आमची लोकसभेच्या बाबतीत चर्चा झालेली नाही. जयंत पाटील इंडियाचा भाग आहेत.” असेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांवर टिका करणाऱ्या बंडखोर आमदारांवर बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “अनेक आमदार 17-18 वर्ष मंत्री राहिले आहेत. ते मंत्री होते तेंव्हा पवार साहेबांची कोणतीहो कृती त्यांना चुकीची वाटली नाही. आज त्याच आमदारांची स्वतःची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळेच ते शरद पवार यांना दोष देत आहेत.” असेही ते म्हणाले.
नांदेड येथिल शासकिय रूग्णालयात झालेल्या मृत्युकांडावर भाष्य करताना त्यांनी हि नांदेड ची घटना अंत्यत गंभीर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “रुग्णालयासाठी औषधं खरेदी करण्याचा निर्णय स्वतःकडे घेतला तोच या घटनेला कारणीभूत आहे. खरेदीचे निर्णय वेळेत झाले नसतील त्याचाच परिणाम या घटनेत झाला आहे. या घटनेला मंत्रीच जबाबदार आहेत.” असा आपोपही त्यांनी केला.
नवाब मलिकांच्या भुमिकेवर बोलताना त्यांनी अजून आपल्याकडे याची माहिती नसल्याचे म्हटले आहे. तसेच नवाब मलिकांना प्रसार माध्यमाशी बोलण्याचा मज्जाव कोर्टानेच केला असल्याने त्याबाबतीत अजून काही सांगू शकत नसल्याचेही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे.








