अजित पवार हे लबाड लांडग्याचे लबाड पिल्लु असून आम्ही त्यांनी मानत नाही. तसेच शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात ते कोणत्या कोपऱ्या त बसतील हे सांगता येणार नाही. तसेच 2029 नंतर राष्ट्रवाजी काँग्रेस पार्टी पक्ष शिल्लक राहणार नाही अशी जळजळीत टिका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि शरद पवारांवर केली आहे. त्यांच्या या टिकेने महाराष्ट्रातील राजकिय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली होती. ते म्हणाले, कि राजकीय दृष्टीकोणातून शरद पवार पवार भाजपाचे बाप असून त्यांचे कुटुंब आणि पक्ष फोडण्यासाठी भाजपा जबाबदार आहे. असा आरोप त्यांनी केला होता.
रोहित पवारांच्या या टिकेला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर देताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “रोहित पवारांना माहिती नाही की, शरद पवार यांच्यासारखे ५०० लोक भाजपात आहेत. शरद पवार कोणत्या कोपऱ्यात बसतील हे त्यांना सुद्धा कळणार नाही. महाराष्ट्रात काही चालत नसल्याने रोहित पवार काहीही बोलून लोकांना भावनिक करण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रवादीचा हा शेवटचा मार्ग असून २०२४ सालीपर्यंतच हे दिसणार आहेत. २०२९ मध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि यांचे नेते दिसणार नाहीत.” असा भाकित त्यांनी केले.
गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टिका केली. ते म्हणाले, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाहीत. म्हणून अजित पवार यांना धनगर आरक्षणाबाबत पत्र देण्याची गरज वाटत नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असून अजित पवारांना आम्ही मानत नाही. म्हणून कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.