मुंबई : भारतातील एक श्रीमंत आणि शक्तीशाली क्रिकेट असोसिएशन म्हणुन मुंबई क्रिकेट असोसिएशन ओळखली जाते. या क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचे वातावरण तापले असून यासाठी राजकिय नेतेही रिंगणात आहेत.
या निवडणुकीच्या आधी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली. नव्यानेच बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवड झालेले भाजपचे आशिष शेलारही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्रात राजकिय वातावरण जरी अजूनही तापलेले आहे. एमसीएच्या राजकारणात अनेक नेत्यानी एकमेकांचे हेवेदावे बाजूला सारल्याचे दिसत आहे. एरव्ही राज्याच्या राजकारणात एकमेकांना विरोध करणारे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील याच्याविरोधात पॅनेल केले आहे. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी भाजपच्या नेत्याला पाठिंबा दिला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड हेसुद्धा निवडणूकीच्या रिंगणात त्यांना असून शरद पवार आणि अशिष शेलार यांच्या पॅनलमधून उमेदवारी मिळाली आहे. या पॅनेलकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या डिनरवेळी बैठक घेतली आहे.
Previous Articleकेंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात ‘आप’चा ठिय्या
Next Article Kolhapur: सीएचबीधारकांची दिवाळी झाली गोड








