Rohit Pawar News : शरद पवार साहेबांनी जी घोषणा केली ती सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच केली आहे. पक्षाकडून एखादी घोषणा झाली तर ती आम्ही स्वीकार करतोच. सुप्रियाताई सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे मी अभिनंदन करतो. अजितदादांच ही खूप मोठं काम आहे. विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार पण खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार म्हणून आम्ही काम करत आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी दिल्यावर अजित पवार पत्रकारांशी न बोलता निघून गेले यासंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले की,आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदानंतर विरोधी पक्षनेत्याचं महत्त्वाचं पद आहे.आता हे पद अजित दादांकडे आहे. आमदार म्हणून त्यांच मार्गदर्शन घेत असतो. जेव्हा एखादा मंत्री असतो आणि मंत्री असताना पक्षाचं एखादं महत्त्वाचं पद त्यांच्याकडे असते तेव्हा राज्यावर किंवा पक्षावर अन्याय होत असतो. तसचं दादांच्याकडे विरोधी पक्षनेता पद आहे आणि परत पक्षाचं एखादं पद मिळालं असतं.तर मग कुठं ना कुठं अन्याय झाला असता.आज महाराष्ट्रातील सर्व सामान्यांचे प्रश्न मांडतात. त्यांच पद हे संविधानिक पद आहे.
अजित पवार यांना पद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहे असं सत्ताधारी टीका करत आहेत. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, विरोधकांनी आमच्याबद्दल बोलण्याऐवजी बेरोजगारीवर शेतकऱ्यांवर आणि कष्टकऱ्यांवर बोलावे.भाजपची लोक यावर मात्र काही बोलत नाहीत. आमच्या पक्षाचा विषय आला की ते उड्या मारत बोलतात त्यांच्या मनात जे सुरू आहे ते काही केलं होणार नाही. मी आमदार आहे मला लोकांनी निवडून दिले आहे. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही.पदाधिकारी आणि मोठे नेते यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोहित पवार म्हणाले.