मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार
प्रतिनिधी/ सातारा
पत्रकारांच्या हक्काची असणाऱया अधिस्विकृतीसाठी राज्यभरात लवकरच लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी बोलताना व्यक्त केले. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी राज्यात लढणाऱया मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्षपदी एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी जेष्ठ पत्रकार शरद काटकर यांची सर्वांनुमते निवड केली.
काटकर यांच्या निवडीबद्दल सातारा विश्रामगृहात सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषद, जिल्हा पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघ सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियांचे अधिकारी, पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थितीत शरद काटकर यांच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल सत्काराचे आयोजन केले होते. घरच्या सत्काराने भावूक झालो आहे. आजपर्यंत सर्वसामान्य पत्रकारांसाठी करत असलेल्या कामाची दखल संघटनेच्या वरिष्ठांनी घेतल्याने माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीला विश्वासाने सार्थ ठरवणार असल्याचा विश्वास शरद काटकर यांनी आपल्या मनोगतातून बोलताना व्यक्त केला.
शरद काटकरांच्या सत्काराच्या निमित्ताने सर्व पत्रकारांची एकी दिसून आली. माध्यमांमध्ये काम करताना मतभेद हेवेदावे बाजूला ठेऊन सर्वांनी एकजूटीने काम करणं गरजेचे आहे. हे शरद काटकर यांच्या सत्काराच्या निमित्ताने पहिल्यांदा दिसून आलं. सातारा विश्रामगृहात सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच श्रमिक पत्रकारांच्या मोठय़ा संख्येने दाखवलेल्या उपस्थितीने शरद काटकरांवरील प्रेम आणि त्यांची योग्य केलेल्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी शरद काटकर यांना शुभेच्छा दिल्या.
मराठी पत्रकार परिषद व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे म्हणाले, शरद काटकरांवर कादंबरी लिहावी लागेल असे व्यक्तिमत्व आहे, माझ्या व्यक्तिगत तसेच सार्वजनिक आयुष्यात गुरू मार्गदर्शक व पाठीराखा म्हणून त्यांचं योगदान वडिलकीच्या नात्यासमान आहे. जिह्यातील पत्रकारांना एक ठेवण्यासाठी अण्णा उर्फ शरद काटकर यांच कायमच मार्गदर्शन मिळत असते त्यांच्या शिकवणीतूनच आजपर्यत आमच्या कार्याची वाटचाल सुरू असल्याचे पाटणे यांनी सांगितले.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी म्हणाले, सर्वांच्या अडी अडचणींला धाऊन जाणारे एकमेव शरद काटकर आहेत. माझ्या करिअरच्या सुरूवातीला आलेल्या वैयक्तिक अनुभवातुन मी हे सांगतो. अनेकांचे कार्यक्रम घेतले मात्र आजपर्यंत सर्व कार्यक्रमांची सूत्रं नेहमीच शरद काटकर यांच्या हातात होती. लवकर राज्याच्या विविध प्रश्नासंदर्भात लढवय्ये असणाऱया शरद काटकरांची तोफ धडाडणार आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच वाटचाल आजही करत असल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगितले.
या कार्यक्रमाला सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस दीपक प्रभावळकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक सुजित आंबेकर, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, जीवन चव्हाण, गजानन चेणगे, तुषार भद्रे, तुषार तपासे, संतोष नलावडे दीपक दीक्षीत, चंद्रसेन जाधव, विठ्ठल हेंद्रे, विनीत जवळकर, सनी शिंदे, प्रतिक भद्रे, गुरूनाथ जाधव, ओंकार कदम, प्रशांत जगताप, पद्माकर सोळवंडे, प्रकाश शिंदे, सचिन सापते, चंद्रकांत कुंभार, शशिकांत कणसे, अमीत वाघमारे, साई सावंत, जावेद खान, संजय कारंडे, अमोल निकम यांच्यासह सर्व वृत्तपत्रांचे संपादक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रमुख, प्रिंट, इल्ट्रॉनिक्स, मराठी पत्रकार परिषदेचे सोशल मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी शरद काटकर यांना शुभेच्छा देत मराठी पत्रकार परिषदेच्या आगामी आधेवशनासंर्भात व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एस.एम. देशमुख व किरण नाईक तसेच सर्व पदाधिकाऱयांच्या सोबत एकत्र ठामपणे राहत पत्रकारांच्या आधिस्विकृतीचा लढा राज्यभर सुरू करणार असल्याचे कार्यक्रम प्रसंगी शदर काटकर यांनी बोलताना सर्वांनुमते सांगितले.








