दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग शहरातील प्रसिद्ध पुरोहित शरद उर्फ बाळकृष्ण व्यंकटेश मणेरीकर यांचे आज दुख:द निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. म्हणून त्यांना गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. संपूर्ण कसई – दोडामार्ग शहरासहित तालुक्यात ते ‘शरद भटजी’ या नावाने सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरातील अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयांची बाजारपेठ मधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले.
Previous Articleसांगलीत बांगलादेशी घुसखोरास अटक
Next Article ‘संगमेश्वर-ओणी’ मार्गाला संभाजीराजांचे नाव द्या









