वृत्तसंस्था/ डल्लास
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या डल्लास खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हने टॉमी पॉलचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता शेपोव्हॅलोव्ह आणि नॉर्वेचा कास्पर रुड यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात शेपोव्हॅलोव्हने टॉमी पॉलचा 7-5, 6-3 असा पराभव केला. हा सामना दीड तास चालला होता. दुसऱ्या उपांत्य लढतीत कास्पर रुडने स्पेनच्या जॉमी मुनारचे आव्हान 6-2, 2-6, 7-6 (7-4) असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली.









