सरोजनी नायडू यांच्या बायोपिकमध्ये दिसणार
अक्षय कुमारसाब्sात ‘सौगंध’, मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत ‘फूल और अंगार’ आणि सनी देओलसोबत ‘वीरता’ चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री शांतिप्रिया बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 90 च्या दशकातील चर्चेत राहिलेली अभिनेत्री आता सरोजनी नायडू यांच्या बायोपिकमध्ये दिसून येणार आहे.
चित्रपटसृष्टीपासून इतकी वर्षे दूर राहिल्याचे वैषम्य नाही. आई आणि पत्नीची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी ब्रेक घेतला होता. स्वतःचे कर्तव्य पूर्ण करून मी आता येथे परतणार असल्याचे शांतिप्रिया यांनी म्हटले आहे.
शांतिप्रिया यांनी काही वर्षांपर्यंत टीव्ही शोंमध्ये काम केले आहे. सध्याच्या पिढीला पाहून प्रेरित व्हायला होते. केवळ विवाह नव्हे तर आई झाल्यावरही अनेक जणी कमी काळातच चित्रपटाच्या सेटवर परतत आहेत. माझ्या मुलांनी मला अभिनयाच्या क्षेत्रात परतण्यासाठी प्रेरित केल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेत्री शांतिप्रिया आता स्वातंत्र्यसेनानी सरोजनी नायडू यांच्या बायोपिकद्वारे मोठय़ा पडद्यावर परतणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून तो तेलगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जूनमध्ये याचे चित्रिकरण सुरू होईल आणि त्यापूर्वी मला भरपूर तयारी करायची असल्याचे त्या म्हणाल्या.









