सावंतवाडी । प्रतिनिधी
भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान संचलित शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुलचे पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच नॅशनल सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन तर्फे घेतल्या गेलेल्या हिंदी स्पर्धा परीक्षेत दिमाखदार यश संपादन केले आहे . यात शांतीनिकेतन स्कुलचा शिष्यवृत्ती परीक्षेत १०० टक्के निकाल लागला असून इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु . प्रणित श्यामसुंदर मेस्त्री हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून 56 वा क्रमांक प्राप्त करत स्कॉलरशिपचा मानकरी ठरला. तसेच हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. सानवी संदीप गावडेने दितीय स्तरावरील परीक्षेत कोकण विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त करत सिल्वर मेडल व 2500 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी संचालक श्री विक्रांत सावंत, उपाध्यक्ष नारायण देवरकर, सचिव व्हि. बी नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब नंदीहळी, मुख्याध्यापक श्री समीर परब व व संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले









