कुंकळ्ळीतील मूळ स्थानी येणाऱ्या देवीची भाविकांना प्रतीक्षा, दर्शनासाठी ठिकठिकाणी होईल गर्दी
कुंकळ्ळी : फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थानचा सुप्रसिद्ध वार्षिक छत्रोत्सव-गुलालोत्सव उद्या रविवार 12 रोजी साजरा केला जाणार आहे. भाविकांना ओढ लागून राहणाऱ्या संस्थानच्या महत्त्वाच्या उत्सवांमध्ये याचा समावेश होतो. वर्षातून एकदा कुंकळ्ळीतील आपल्या मूळ स्थानी येणारी देवी हे या उत्सवाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्या असते आणि ठिकठिकाणी देवीचे स्वागत करून दर्शन घेण्यासाठी भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. यानिमित्त उद्या सकाळी बारा छत्र्या रंगीबेरंगी कापड, खण, फुलांनी सजवून सज्ज ठेवण्यात येतील. त्याआधी अभिषेक व नंतर होळीपूजनाला प्रारंभ होईल. यावेळी ओढ्यातून आंब्याची फांदी बारा गावकार उचलून बाहेर आणतील. सदर फांदी घेऊन ढोलताशांच्या गजरात मंदिरासभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर मंदिरासमोर विधिवत फांदी रोवून उभी केली जाईल. नंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर श्रींची मूर्ती पालखीत विराजमान केल्यावर गुलाल अर्पण करण्यात येईल व दुपारी 1 च्या सुमारास गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात 12 छत्र्या नाचवत पालखी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात येईल. पालखी गोविंदाघाटमार्गे मूळ जागी तळेभाट येथे जाण्यास निघेल. वाटेत मल्लागिणी, सिद्धनगर, भिवसा, ओडी येथे दर्शनासाठी थांबा घेऊन नंतर तळेभाट-कुलवाडा येथे पोहोचेल. येथे भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळत असते. छत्र्या नाचविण्यात तऊण व अन्य भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. उपस्थितांमध्ये सर्व धर्मांतील नागरिकांचा सहभाग असतो. देवीची खणा-नारळाने ओटी भरण्याकरिता महिलांची मोठी गर्दी होत असते. भाविक एकमेकांना गुलाल लावण्यात रंगून जात असतात.
तेथून पुढे निघालेली पालखी मा•िकट्टा येथे थांबा घेईल. येथेही भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत असतात. त्यानंतर म•ाr, देमानी येथे राष्ट्रीय महामार्गावर आणि देमानीवाड्यावर थांबा घेण्यात येईल. नंतर जुझेगाळ, पुन्हा मल्लागिणी, कटा या मार्गाने पालखी मिरवणूक येऊन बोमडामळ येथे थांबा घेईल. या ठिकाणीही भाविकांची गर्दी होत असते. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीतील काही जणांचा माडेमळ येथील श्री कळपुऊषाच्या भेटीस जाण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर पालखी परत श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरात येईल. यावेळी सभामंडपात छत्र्यांची ओवाळणी झाल्यावर सदर छत्र्या श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानाकडे नेण्यात येतील. तेथे सदर छत्र्या एका रांगेत उभ्या करून त्यांची ओवाळणी केली जाईल. तेथून त्या माघारी परतल्यावर त्यांच्या ठरलेल्या जागी ठेवल्या जातील. त्यानंतर पारंपरिक विधी आटोपल्यावर रोमटामेळाला प्रारंभ होईल. सदर मेळ मंदिराला वळसा घालून चौकात आल्यावर धूळपेट, आरत्या, तीर्थप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होईल. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थान सा†मतीचे अध्यक्ष कवेंद्र नाईक देसाई, सचिव विराज देसाई, कोषाध्यक्ष दर्शन देसाई व मुखत्यार सुभाष नाईक देसाई हे परिश्रम घेत आहेत.









