वार्ताहर /जुने गोवे
मरडवाडा दिवाडी येथील श्री शांतादुर्गा बाल गजानन देवस्थानचा पंधरावा वर्धापनदिन सोहळा गुऊवार दि. 2 ते शनिवार दि. 4 फेब्रु.पर्यंत विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.
दि. 2 रोजी सकाळी 9 वा. हवनद्वारा नवचंडी, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. कार्यक्रमाचे यजमानपद बाबुसो लक्ष्मण वेरेकर भूषवितील. सायं. 7 वा. सुहासिनींतर्फे दीपोत्सव तद्नंतर आरती व तीर्थप्रसाद होईल. दि. 3 रोजी सायं. 4 वा. श्री सत्यनारायण महापूजा, तद्नंतर आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. महापूजेचे यजमानपद लवु जनार्दन वायंगणकर भूषविणार आहेत. दि. 4 रोजी रात्री 10 वा. श्री शांतादुर्गा बाल गजानन हौशी नाट्या मंडळातर्फे विनय केळुसकर लिखित व लवु वायंगणकर निर्मित ‘कर्तव्य’ हे मराठी नाटक सादर करण्यात येईल. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









