न्हावेली / वार्ताहर
श्री.देवी माऊली गिरोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आरोस दांडेली ता. सावंतवाडी. या देवस्थान कमिटीचा पाच वर्षाचा कार्यकाळ दिनांक 02/07/2024 रोजी संपल्याने पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी आरोस ग्रामपंचायतीच्या वतीने आरोस व दांडेली गावातील ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी श्रीदेव गिरोबा मंदिराच्या सभागृहात सरपंच श्री.शंकर विष्णू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी आरोस व दांडेली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक श्री कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत करून देवस्थान कमिटी निवड करणे बाबतचे नियम व कार्यप्रणाली सर्वांसमोर मांडली. कमिटीचे सचिव श्री सिद्धेश नाईक यांनी कमिटीचा मागील पाच वर्षांमध्ये झालेला जमा खर्च सभेमध्ये मांडला.अध्यक्ष श्री शंकर नाईक यांनी श्री. गिरोबा मंदिर जिर्णोद्धाराचे काम हे 70 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले.सदर कमिटीचे हे मागील पाच वर्षाचे काम हे अतिशय चांगले झालेले असून पुढील काळातही सदर ह्याच कमिटीला काम करण्याची संधी द्यावी असे ज्येष्ठ ग्रामस्थ नारायण मोराजकर यांनी सुचविले त्यांना शरद नाईक यांनी अनुमोदन दिले.आणि विद्यमान कमिटीच्या फेरनिवडीचा ठराव सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.कार्यकारणी पुढील प्रमाणे शंकर विष्णू नाईक अध्यक्ष,गजानन जगन्नाथ परब उपाध्यक्ष,सिद्धेश बुधाजी नाईक सचिव,श्रीधर यशवंत नाईक खजिनदार, श्री तानाजी वामन खोत सदस्य शांताराम भिवा नाईक सदस्य,प्रसाद जयराम नाईक सदस्य,गुरुनाथ साबाजी नाईक सदस्य सत्यवान प्रभाकर नाईक सदस्य, बाळाजी रामचंद्र अभ्यंकर सदस्य, शांताराम नवसो आरोलकर सदस्य, आनंद शशिकांत नार्वेकर सदस्य,प्रकाश विठ्ठल नाईक सदस्य,विश्वास अंकुश मोरजकर सदस्य,गुरुनाथ बोंबडो आरोसकर सदस्य.यावेळी आरोस दांडेली गावातील ग्रामस्थ,सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,देवस्थान मानकरी उपस्थित होते.
Previous Articleमालवणमध्ये राष्ट्र सेविका समितीतर्फे पथसंचलन
Next Article धक्कादायक! २४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा









