वृत्तसंस्था /मुंबई
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडने मुंबई इंडियन्सशी फारकत घेतली असून गेल्या नऊ वर्षापासून तो या संघाचा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता, त्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे या फ्रँचायजीनी बुधवारी जाहीर केले. 2015 पासून बाँड मुंबई इंडियन्सशी निगडित असून गोलंदाज प्रशिक्षक म्हणून त्याने चारदा आयपीएल जेतेपद मिळविले. 2024 या मोसमासाठी मुंबई इंडियन्सने लंकेच्या लसिथ मलिंगाची गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यामुळे बाँडने हा संघ सोडण्याचा निर्णय घेतला. याशिवाया एमआय एमिरेट्सच्sढ प्रमुख प्रशिक्षकपदही त्याने सोडले आहे. 2021 मध्ये निवृत्त झालेल्या मलिंगा मुंबई इंडियन्सकडून खेळला असून त्याने यावर्षीपर्यंत तो राजस्थान रॉयल्ससाठी काम पाहत होता. या वर्षी झालेल्या आयएलटी-20 च्या पहिल्या मोसमात एमआय एमिरेट्स संघाची जबाबदारी शेन बाँडकडे होती. मुंबई इंडियन्सची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल बाँडने अंबानी कुटुंबियांचे आभार मानले आहेत. मुंबई इंडियन्समधील युवा गोलंदाजांना तयार करण्याचे काम केले असून भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहदेखील आपल्या करियरच्या सुरुवातीला योग्य मार्गदर्शन करण्याचे श्रेय बाँडला दिले आहे.









