संजय कपूरची कन्या शनाया कपूरचा आंखों की गुस्ताखियां प्रदर्शित झाला असला तरीही तो फ्लॉप ठरला आहे. यामुळे शनायासमोर कारकीर्द घडविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अशास्थितीत आता करण जौहर तिच्या मदतीसाठी धावून आला आहे. करण जौहर आता ‘स्टुडंट ऑफ द ईयर 3’ निर्माण करणार असून यावेळी हा चित्रपट नव्हे तर एक सीरिज म्हणून प्रदर्शित होणार आहे.
स्टुडंट ऑफ द ईयर 3 मध्ये शनाया दुहेरी भूमिकेत असणार आहे. शनाया कपूरकरता ही मोठी संधी ठरणार आहे. या वेबसीरिजचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. शनायाने आतापासूनच याकरता तयारी चालविली असल्याचे समजते.
शनायाचा विक्रांत मैसीसोबतचा ‘आंखों की गुस्ताखियां’ चित्रपट फारसा चालला नाही. शनायाच्या अभिनयात फारसा दम नसल्याचे प्रेक्षकांचे मत तयार झाले आहे. यामुळे शनायाला आता स्वत:वरील ही टीका खोडुन काढण्याची संधी करण जौहरकडून मिळाली आहे.









