जवळपास 3 वर्षांनंतर रणबीर कपूरचे दोन चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ रिलीजसाठी सज्ज झालेत. ‘शमशेरा’ 22 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे, तर ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. अशामध्ये शमशेरामधील रणबीर कपूरच्या फर्स्ट लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटातील रणबीरचा नवा आणि दमदार लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रणबीरचा हा लूक पाहून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त उत्सुकता वाढली आहे.
बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘शमशेरा’ बाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. रणबीर कपूरचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त संजय दत्त आणि वाणी कपूर हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. टीझर पाहून प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. अशामध्ये आता या चित्रपटातील मुख्य अभिनेता रणबीर कपूरचा नवा लूक लीक झाला आहे. रणबीर कपूरचा हा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
Previous Articleशिरवळ जवळील अपघातात कोल्हापूरचा एक वारकरी ठार; 30 जखमी
Next Article मुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडे स्ट्रीट मोहीम









