वृत्तसंस्था / दुबई
आशियाई क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी लंकेच्या शम्मी सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा हे एसीसीचे अध्यक्ष होते. पण अलिकडेच जय शहा यांचे आयसीसीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आल्याने शहा यांचे एसीसीचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. लंकेचे शम्मी सिल्वा हे यापूर्वी एसीसीच्या अर्थ आणि मार्केटिंग समितीचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे एसीसीचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे.









