Shambhuraj Desai On Ajit Pawar : सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी हाय पॉवर समिति गठीत करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, महविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ते यशस्वी ठरले नाहित. विरोधी पक्षाच्या काळात दोन आठवडे अधिवेशन चालवलं का?असा सवाल त्यांना यावेळी केला. ते नागपूरला कधी गेले होते का असेही ते म्हणाले. ठाकरे सेना जी शिल्लक राहिली आहे ते सभागृहात उपस्थित नसायचे.पाच महिन्याच्या काळात बाळासाहेबांच्या शिवेसेंनेचे सरपंच निवडून आले.
भास्कर जाधवां विषयी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, भास्कर जाधवांना किती महत्व द्यायचे हे ठरवले पाहिजे.भास्कर जाधवांवर बोलायला आम्हाला पण येतंय असेही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षात उठाव केला आणि आम्हाला यश आले. सत्तेचा गैरवापर होत नाहीं. जो दोषी असेल गैरव्यवहार केला असेल तर त्याला सामोरे जावे लागेल.लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करतोय. शरद पवारांना कामातून दाखवू लहान मुलगा सुद्धा काय काम करु शकतो असा खोचक टोलाही लगावला.
अजित पवारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की,धर्मवीर संभाजी महाराज हे नाव पहिल्यापासून इतिहासात पडले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणाले तर ते दादांना मान्य नाहीं का? एका बाजुला थोर पुरुषांच्या आदर करा म्हणायचे अन् दुसरीकडे… लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी म्हण सांगत विरोधीपक्ष नेते अजित पावारांवर निशाणा साधला.
Previous Articleमंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याचे संकेत,हालचाली सुरु
Next Article माजी आमदारांची कार पलटी..!








