Shambhuraj Desai : जुने मुख्यमंत्री आमचेच होते त्यावेळी मी त्यांच्याच मंत्रीमंडळात होतो. पण सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यावरून चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हवाई सफर आवडत नाही असा टोला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, परिषद सुरु असतानाच विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने मंत्री संतप्त झाले. राज्य उत्पादक शुल्कच्या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी चांगलेच झापले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यात त्यांनी 19 हजार कोटी रुपये निधी निती आयोगाच्या माध्यमातून राज्याला त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवर प्राधान्याने खर्च करण्याची गरज आहे त्यावर आम्ही करीत आहोत. भारत देश स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे राज्यात एक लाख 82 हजार शासकीय व निमशासकीय पदे भरणे रिक्त आहेत त्यापैकी 75 हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









