Shambhu Raje Desai : गेली अडीच वर्ष राष्ट्रवादी शिवसेनेला पोखरत होती. त्या राष्ट्रवादी काॅंग्रेसपासून वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तो यशस्वी देखील झाला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी युती केली. तीच युती आम्ही नव्याने पुढे घेऊन चाललो आहे. जे काम त्यांच्याकाळात झालं तसेचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात करणार.बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे.
शिवसेना कोणाची या संदर्भात बोलताना ते म्हणाले, आमचे ५५ आमदार विधानसभेत होते. त्यापैकी ४० आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आहेत. १२ खासदार शिंदे गटात आहेत. बहुतांशी सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सरपंच हे आजही बहुमतानं शिंदे गटासोबत आहेत.आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. घटनेने निवडणूक आयोगाला जो अधिकार दिला आहे. त्या आयोगावर आमचा विश्वास आहे. ज्या बाबी आम्ही सर्वोच्च न्यायालयासोर, निवडणूक आयोगासमोर मांडू त्यानुसार न्याय आम्हाला मिळणार याचा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संजय राठोड यांच्यावर चित्रा वाघ यांनी आरोप केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले, तपास यंत्रणांनी क्लिन चीट दिली आहे. तर त्यांना वारंवार दोषी आहे अस म्हणू नये असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








