सांगरूळ / वार्ताहर
म्हारुळ (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शालाबाई गणपती गुरव यांची बिनविरोध निवड झाली .रूपाली चौगले यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त होते .ग्रामपंचायत सदस्यांची बैठक मंडल अधिकारी अजित माने यांच्या अध्यक्षतेखाली होऊन वरील बिनविरोध निवड झाली.
दोन वर्षांपूर्वी झालेली म्हारुळ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती . सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सरपंच पद रोटेशन पद्धतीने प्रत्येकाला एक वर्षे देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते .यानुसार पहिल्या वर्षी वंदना नामदेव म्हाकवेकर यांना सरपंच पदाची संधी मिळाली .दुसऱ्या वर्षी रूपाली मोहन चौगले यांना संधी देण्यात आली. त्यांची मुदत संपताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते .या पदावर शालाबाई गुरव या ज्येष्ठ महिला सदस्यांना संधी देण्यात आली . नूतन सरपंच शालाबाई गुरव यांचा मावळत्या सरपंच रूपाली चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सरपंच शालाबाई गुरव यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावातील प्रमुख नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये चांगल्या प्रकारची विकास कामे करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली
यावेळी उपसरपंच सरदार पाटील, सदस्य सागर चौगले, राजाराम कुंभार, प्रकाश कांबळे ,वंदना म्हाकवेकर ,रूपाली चौगले ,अलका पाटील ,रेखा कुंभार, बाजीराव पाटील ,सिंग्रापा पाटील ,आनंदराव शिंदे ,एकनाथ चौगले, राजाराम पाटील ,सरदार पाटील पोलीस पाटील सागर कुंभार, पंढरीनाथ मडके तलाठी भोई यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते . ग्रामसेवक पी एस मेंगाने यांनी आभार मानले .