वृत्तसंस्था / चेन्नई
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तपासणी झाल्यानंतर काही वेळातच त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी घडली. त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही, असे डॉक्टरांनी नंतर स्पष्ट केले आहे.
दास हे चेन्नई येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना मंगळवारी आम्लपित्ताचा त्रास होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना हा त्रास अधून मधून होत असतो, अशी महिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम असून ते लवकरच कामाला प्रारंभ करतील, असेही यांच्यासंबंधी स्पष्ट करण्यात आले आहे.









