वृत्तसंस्था/ मीरपूर
बांगलादेशचा अनुभवी आणि अष्टपैलू शकीब अल हसनचे अफगाणविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेश संघात पुनरागमन झाले आहे. या मालिकेसाठी क्रिकेट बांगलादेशने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे.
या मालिकेसाठी बांगलादेश वनडे संघाचे नेतृत्व तमीम इक्बालकडे सोपवण्यात आले आहे. 5 जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुखापतीमुळे शकीब अल हसनला अफगाण बरोबरच्या एकमेव कसोटी सामन्यात खेळता आले नव्हते. बांगलादेश संघाने अलीकडच्या कालावधीत वनडे क्रिकेट प्रकारात सामाधानकारक कामगिरी केली आहे. बांगलादेश आणि अफगाण यांच्यातील पहिला वनडे सामना 5 जुलैला, दुसरा सामना 8 जुलैला तर तिसरा सामना 11 जुलैला होणार आहे. हे सर्व सामने चेतोग्राममध्ये खेळवले जातील.
बांगलादेश संघ-तमीम इक्बाल (कर्णधार), लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन, मुशफिकर रहीम, टी. रिदॉय, मेहदी हसन मिराज, ताजुल इस्लाम, तस्कीन अहमद, इबादोत हुसेन चौधरी, मुस्ताफिजूर रेहमान, हसन मेहमूद, शोरिपुल इस्लाम, अफीफ हुसेन, नईम शेख.









