वृत्तसंस्था/ मुंबई
2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा बांगलादेशचा कर्णधार अष्टपैलू शकीब अल हसन आता आपल्या वैयक्तिक समस्येमुळे तसेच अन्य आंतरराष्ट्रीय करारामुळे संपुर्ण स्पर्धेत उपलब्ध होऊ शकणार नाही. सदर माहिती कोलकाता नाईट रायडर्सच्या प्रवक्त्याने दिली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या पंजाब संघाविरुद्धच्या सामन्यात शकीब अल हसन खेळू शकला नव्हता. आता कोलकाता संघाचे फ्रांचायझी अष्टपैलू शकीब अल हसनच्या जागी दुसऱ्या बदली खेळाडूची निवड लवकरच करणार असल्याचे समजते. कोलकाताचा या स्पर्धेतील पुढील सामना रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळूरबरोबर 6 एप्रिलला इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.









