अजय देवगण आणि आर. माधवन यांचा चित्रपट ‘शैतान’ 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता शैतान 2 चित्रपटावर काम सुरू असून या नव्या चित्रपटाचा जुन्या ‘शैतान’च्या कहाणीशी कनेक्शन नसेल. शैतान 2 मध्ये पूर्वीच्या चित्रपटातील अजय देवगण, आर. माधवन, ज्योतिका आणि जानकी बोदीवाल हे कलाकार असणार आहेत. याचबरोबर काही नव्या कलाकारांची यात एंट्री होणार आहे.
निर्मात्यांनी ‘शैतान’ आणि ‘मां’ या चित्रपटादरम्यान कनेक्शन तयार केले असून यामुळे चाहत्यांचा रोमांचकारी अनुभव वाढणार आहे. शैतान 2 चित्रपटात काजोल कॅमियो भूमिकेत दिसून येण्याची शक्यता आहे. शैतान 2 ची कहाणी पहिल्या चित्रपटापेक्षा वेगळी असणार आहे. विकास बहल हाच या सीक्वेलचे दिग्दर्शन करणार आहे. गोलमाल 5 चे चित्रिकरण पूर्ण केल्यावर अजय देवगण शैतान 2 या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आहे.









