तर व्हाईस चेअरमन पदी रामदास मेस्त्री यांची निवड
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
नुकतीच परमे ग्रुप विविध कार्यकारी संस्था भेडशी या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली.निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून चेअरमनपदी शैलेश दळवी तर व्हाईसचेअरमनपदी रामदास मेस्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पल्लवी पै यांनी काम पाहिले. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, युवा तालुकाप्रमुख भगवान गवस, दादा देसाई,नंदू टोपले, गुरु सावंत,मंगेश शिरसाट,राजदत्त वेटे, हर्षा टोपले, संचालक आत्माराम देसाई, बाबा मयेकर,अरुण गवळंडकर, गणेश धुरी, वासुदेव नाईक, रामकृष्ण सावंत,संगीता वेटे, पांडुरंग बेळेकर, दत्ताराम जंगले, विजय जाधव, कल्पना बुडकुले आदी उपस्थित होते.निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन शैलेश दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेची असणारी थकबाकी वसूल करून संस्था नफ्यात आणून तसेच शेतकऱ्यांना सुलभ कर्ज वाटप करून संस्था प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील व सहकार क्षेत्र वाढविले जाईल असे प्रतिपादन शैलेश दळवी यांनी केले.त्याचबरोबर सहाय्यक निबंधक पल्लवी पै यांनी संस्थेची बँकिंग प्रक्रिया सुलभ करून ठेवी,पिग्मी या सेवा उपलब्ध करून संस्था नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले.









