Kolhapur Ganesh Visarjan 2022 : कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर नवीन फर्मान काढण्यात आले आहे. यंदाच्या मिरवणुकीत लेझर इफेक्टला प्रशासनाने बंदी घातली आहे. लेझर इफेक्ट वापरू नका असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. धोकादायक लेझर इफेक्ट वापरल्यास मंडळांवर कारवाई होणार अशी माहिती पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, गणेश विर्सजनावेळी महाद्वार रोडवर गर्दी होऊ नये म्हणून प्रमुख मार्गासोबत पर्यायी मार्गाचा वापर करा अस आवाहन काल केलं होत. याला सकारात्मक प्रतिसाद देत एका दिवसात ८० मंडळाने होकार दिला आहे. या मंडळाचे मी आभार मानतो. दरवर्षी पोलिस महिलांसोबत वाद होत असतात ते होवू नये म्हणून गेल्या एक महिन्यापासून नियोजन करत आहोत. यासाठी प्रत्येक मंडळाने बिनखांबी गणेश मंदिर किंवा मिरजकर तिकटी या प्रवेशाद्वारात प्रवेश करताच महाद्वार रोड ते पापाची तिकटी हे अंतर एका तासात कव्हर करावे. यामुळे प्रत्येक मंडळाला आपला देखावा दाखवता येईल असेही आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पूर्वी जो पर्यायी मार्ग होता त्याला समांतर मार्ग घोषित केला असल्याचेही त्यांनी सांगितले.उमा टाॅकीज, बिंदु चौक, शिवाजी चौक, चप्पल लाईन, पापाची तिकटी या मार्गावर राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी बुथ उभारावेत असं पोलिस प्रशासनाने आवाहन केल होत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नेमके काय घडले
कोल्हापुरात बाप्पाच्या स्वागतासाठी काही मंडळांनी मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केला. लेझरच्या सानिध्यात मिरवणुकीत फोटो काढणाऱ्या सुमारे २५ हून अधिक मोबाईलचे स्क्रिन फराब झाले. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लेझर लाईटचा इम्पॅक्ट डोळ्यांवर देखील होतो. काही वर्षापूर्वी इचलकरंजीत लेझर लाईटमुळे पक्षांना आपला जीव गमवावा लागला होता.
यंदाच्या गणेश विर्सजनात प्रशासनाकडून केलेले बदल
-शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा ठेका रात्री बारा वाजताच बंद केला जाईल अशी ठाम भूमिका.
-कृत्रिम यंत्राचा वापर करून घरगुती गणेश विर्सजन
-साऊंड सिस्टीम वापरत असताना सामाजिक भान वापरा अस आवाहन
-यंदाच्या निवडणुकीत लेझर इफेक्टला बंदी घातली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









