वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये पोलीस स्थानकावर हल्ला केल्यावर फरार झालेला मुख्य आरोपी शहजाद अलीला अखेर अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या एका टिप्पणीच्या विरोधात शहजाद अली 21 ऑगस्टसोबत जमावासोबत पोलीस स्थानक परिसरात पोहोचला होता, त्यावेळी या जमावाने हिंसा केली होती. दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
हिंसेनंतर शहजाद फरार झाला होता. पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. स्थानिक खबरे आणि तांत्रिक टेहळणीच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाशी संबंधित राहिलेला शहजाद अली हा हिंसेवेळी जमावाचे नेतृत्व करत होता.
हिंसेच्या घटनेनंतर शहजाद अलीचा कोट्यावधींचा बंगला प्रशासनाने जमीनदोस्त करविला होता. तर शहजाद अलीने एक व्हिडिओ जारी करत आपण निर्दोष असल्याचा दावा केला होता. दगडफेकीत आपला हात नव्हता, हिंसेमागे समाजकंटक होते असे शहजादने व्हिडिओत म्हटले होते.









