शाहुवाडी प्रतिनिधी
सुपात्रे ता. शाहूवाडी येथील प्रकाश शंकर कांबळे वय ३९ यांच्या राहत्या घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तिजोरी व लाँकर्समधील सुमारे दोन लाख चाळीस हजार रूपयेचे सोन्या,चांदीचे दागिने व रोख रक्कमेसह ऐवज लंपास करून पोबारा केल्यांची नोंद शाहूवाडी पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.८ जानेवारी रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांने प्रकाश कांबळे यांच्या घराचा दरवाज्याचे कुलूप फोडून तिजोरीतील लाँकर्स व लोखंडी पेटीतील दीड तोळ्यांचा सोन्याचा लक्ष्मीहारसह इतर दागिने असा अडीड तोळ्याचा माल तसेच रोख रक्कम असा २ लाख ४० हजार रूपयेचा ऐवज लंपास केला. फिंगर प्रिंन्ट व डॉग स्कॉड घटनास्थळी आल्यानंतर दागिने व रोख रक्कम याची खात्री करुन फिर्याद देण्यात आली आहे. दरम्यान करवीर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी, कोडोलीचे पोलिस निरिक्षक अरविंद काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास फौ. प्रसाद पांढरे करित आहेत.