शाहूवाडी प्रतिनिधी
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यात केरेवाडी गावाजवळील उड्डाण पुलावरून पायी चाललेल्या वारणा कापशी (ता.शाहूवाडी )येथील सदगुरु संत बाळुमामा आषाढी पायी वारकरी दींडीत चारचाकी गाडी घुसल्याने 14 वारकरी जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे.
याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी पंढरपूरची आषाढी एकादशी रविवारी असल्याने कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यातील आनेक वारकर्यांच्या पायी दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. वारणा कापशी (ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर) येथील सदगुरु संत बाळुमामा आषाढी पायी दींडी पंढरपूरच्या दीशेने जात होती.दींडीत एकशे तीस वारकरी होते. दींडीतील वारकरी कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी गावाजवळील उड्डाण पुलावरून जात होती. दींडीच्या पाठीमागे रथ होता. प्रत्येक वर्षी नागजच्या हायस्कूल मध्ये दींडींचा मुक्काम असतो. मुक्कामाचे ठीकाण अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आले असता मिरजकडून पंढरपूरच्या दीशेने चारचाकी पिकअप गाडी क्रमांक एम.एच.08-डब्लु:5711 भरधाव वेगाने जात होती त्यावेळी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडीने प्रथम रथाला धडक दिली व पायी चाललेल्या दींडीत घुसून पलटी झाली त्यात एकुण चौदा वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयात व नंतर मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलेआहे.
अपघाताच्या ठिकाणी वारकरी दींडीत गाडी घुसल्याने वारकऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांचे साहित्य अस्ताव्यस्त विस्कटले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट देऊन माहिती घेतली.कवठेमहांकाळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, सागर गोडे,पोलिस मनोज पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
जखमींची नावे:शंकर गणपती पाटील वय 42 (मानगाव),सुशांत सर्जेराव पाटील वय 26 ( शिवरे)बनाबाई पाटील (शिवरे), राजाराम बानु पाटील (पाटणे), सखुबाई शामराव जाधव वय 60 (शिवरे), आक्काताई आनंदा नाईकवडी वय 60 (कारंडवाडी), आक्काताई बाळासाहेब पाटील वय 69 (शिवरे), प्रकाश रामचंद्र जाधव वय 60 (शिवरे), आक्काताई अनिल कांबळे वय 50 (शिवरे), शिवाजी बाबुराव चौगुले वय 59 (मणगाव), सुरेश शिवाजी पाटील वय 56 (माणगाव) अन्य जखमींची नावे समजलेली नाहीत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती