प्रतिनिधी/सातारा
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सेंट्रींगप्लेटा व गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल असा एकुण 37 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी अनिकेत ऊर्फ आण्णा अर्जुन पिटेकर (वय-19 वर्षे रा.मु.पो.बेलवडे, ता.कराड, जि.सातारा सध्या रा. ऐक्यप्रेस कॉर्नर,नामदेववाडी झोपडपट्टी,सातारा ), प्रशांत आण्णा खवले (वय 19 रा.ऐक्यप्रेस कॉर्नर,नामदेववाडी झोपडपट्टी,सातारा ) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार गुन्हयातील चोरटयाचा व चोरीस गेले मालाचा शोध घेत होते. त्यांना मंगळवार दि. 19 जुलै रोजी गोपनिय माहिती मिळाली की, आण्णा पिटेकर, प्रशांत खवले हे करंजे परिसरात चोरीच्या सेंट्रींगप्लेटा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिसांनी बुधवार नाका ते करंजे जाणारे रोडने प्रतापसिंह शेती फार्ममधील विसर्जन तळयाचे समोर सदर इसमांना सापळा लावुन मोटार सायकल व सेट्रींगप्लेटासह पकडले. या दोघांना पकडल्या नंतर त्यांचेकडे सेट्रींगप्लेटा बाबत विचारपुस केली असता त्यांनी प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिले. त्यांनतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
हे ही वाचा : कासेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दोघे सराईत तडीपार
दरम्यान, दोन्ही आरोपींना अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कस्टडी मिळाली आहे. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्टेबल हसन तडवी, बळीराम सणस, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली.









