शाहू महाराजांची घेतली उद्धव ठाकरेंची भेट ! मातोश्रीवर ठाकरे कुटुंबियांकडून जपला छत्रपती आणि ठाकरे कुटुंबियांमधील वारसालोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आज पहिल्यांदाज कोल्हापूर लोकसभेचे नूतन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे कुटुंबियांनी देखिल शाहू महाराज छत्रपती यांचे अत्यंत आपुलकिने स्वागत करत आपल्या कोल्हापूरच्या राजघराण्य़ा बरोबर असलेला आपला कौटुंबिक वारसा जपला. यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे सुद्धा उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने चांगलेच यश संपादन केले. या निवडणुकीमंध्ये महायुतीकडे असलेली कोल्हापूर ची जागा आपल्याकडे खेचून आणण्यात महाविकास आघाडीला यश आले. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणुकीसाठी उमेदवार असल्याने सर्व पक्षांचा त्यांना पाठींबा मिळाला. विशेषता महाविकास आघाडीतील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शाहू महाराज खासदार व्हावेत यांसाठी विशेष प्रयत्न केले.
अगदी सुरवातीपासून कोल्हापूर लोकसभेची जागा ही शिवसेनेकडे असल्याने महाविकास आघाडीमध्ये शिवसेना- ठाकरे गटाने आपला दावा ठोकला होता. पण शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने शिवसेनेने थोडी नरमाईची भुमिका घेत महाराजांना आपला पाठींबा जाहीर केला. उमेदवारीच्या दरम्यान कोल्हापूरात येऊन उद्धव ठाकरे यांनी नविन राजवाड्यावर शाहू महाराज यांची भेट घेतली होती. तसेच शाहू महाराजांसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेऊन महाराजांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.
लोकसभेच्या निकालानंतर शाहू महाराजांनी आज मुंबईत जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या मदतीबद्द्ल कृतज्ञता व्यक्त केली. शाहू महाराजांच्या मातोश्रीच्य़ा भेटीवेळी आदित्य ठाकरे तसेच रश्मी ठाकरे यांनीही उपस्थित राहून कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि ठाकरे ठाकरे कुटुंबियांचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला.