राधानगरी/ महेश तिरवडे
Radhanagri News : राधानगरी धरणस्थळावर उभारण्यात आलेल्या छ,शाहू महाराज स्मुर्ती केंद्र स्मारक समितीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती निमित्त विविध प्रकारचे उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर संस्थानचे युवराज यशराजे छत्रपती व आ. प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते पुतळा व कलश पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे हे होते.
यावेळी छ. शाहू महाराज स्मुर्ती स्थळावर विधिवत पूजन,शालेय विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच राधानगरी परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान युवक, युवती, माजी सैनिक शासकीय अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आ. प्रकाश आबीटकर,तहसीलदार अनिता देशमुख, पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, गटविकास अधिकारी संदीप भंडारी,फेजीवडेचे सरपंच फारुख नावळेकर,दाजीपूर सरपंच प्रतिभा कोरगावकर,राधानगरीच्या माजी सरपंच कविता शेट्टी,माजी सरपंच बशीर राऊत, सुशिल पाटील कौलवकर,वनक्षेत्रपाल सुहास पाटील, अजित माळी,मंडल अधिकारी, सुंदर जाधव, जलसंपदा विभागाचे अभियंता प्रविण पारकर, समीर निरुखे, यांच्यासह राधानगरी, फेजीवडे, पडळी ग्रा प सदस्य,व्यापारी,शेतकरी यांच्यासह तालुक्यातील अनेक शाहू प्रेमी जनता यावेळी उपस्थित होते.









