ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व निमित्त छत्रपती शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज स्पर्धेचा अंतिम सामना सुरु असताना खेळाडू, प्रशिक्षक यांच्यात मैदानातच राडा झाला. शिवाय दोन प्रशिक्षक यांच्यात जोरदार वाद झाला.
खेळाडू, प्रशिक्षक यांच्यात जोरदार वाद झाल्यानंतर खेळाडूंनी मैदानावरच राडा घालण्यास सुरुवात केली. तर पंचांनी दोन्ही संघातील एका खेळाडूला रेड कार्ड दाखवले. वाद वाढत आहे हे लक्षात येताच मैदानाच्या ठिकाणी उपस्थित असणारे मालोजीराजे छत्रपती यांनी मैदानावर धाव घेत मध्यस्थी करत वाद मिटविला. मैदानावर झालेल्या या कृत्यामुळे फुटबॉल प्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









