तालुकास्तरीय ११ पत्रकारांना आचार्य अत्रे पुरस्कार; तरुण भारत संवादचे सदाशिव आंबोशे, प्रकाश सांडुगडे, विनायक पाटील यांना पुरस्कार जाहीर; २६ जूनला होणार पुरस्कारांचे वितरण
प्रतिनिधी कोल्हापूर
जिल्हा परिषदमध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार देऊन गौरवले जाते. त्यानुसार यंदा उल्लेखनीय काम केलेल्या १६ कर्मचाऱ्यांना शाहू पुरस्कार जाहीर करण्यात आले तर आचार्य अत्रे तालुकास्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी ११ जणांची निवड केली असल्याची माहिती प्रशासक तथा सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी बुधवारी दिली. यामध्ये तरूण भारतचे कागल प्रतिनिधी सदाशिव आंबोशे, प्रकाश सांडुगडे (भुदरगड), विनायक पाटील ( गडहिंग्लज) यांची तालुकास्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या औचित्यावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
जिल्हा परिषदेत विकासकामांच्या विविध योजना राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांचाही मोठा सहभाग असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा व पुढील काम करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेने वर्ग ३ व वर्ग ४ मधील ( ग्रामसेवक व शिक्षक वगळून) कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कारासाठी निवड केली जाते. जिल्हा परिषदेकडील कर्मचाऱ्यांची निवड करतांना त्यांचे गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट शेरे समय सूचकता, प्रशासकीय कामकाजाची माहिती, निर्णवशक्ती नियमांचे ज्ञान सामाजिक व शैक्षणिक कलागुण, सचोटी व प्रामाणीकपणा आदी निकष विचारात घेवून पुरस्कारासाठी निवड केली जाते. प तिवर्षी कर्मचाऱ्यांचे पुरस्कार तालुकास्तरीय समितीने केलेल्या गुणांकनानुसार दिले जातात. तथापि यावर्षी कर्मचायाची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समितीसमोर अर्ज केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना समक्ष बोलविण्यात आले होते. त्यांना त्यांच्या कामकाजाबाबत तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याबाबत प -श्न विचारण्यात आले. त्यांचे एकूण कामकाज करत असलेल्या पदासंदर्भातील ज्ञान, अनुभव, सेवाज्येष्ठता या सर्व बाबी लक्षात घेवून समितीने सर्वानुमते कर्मचारी पुरस्कार्थ्यांची निवड केली. त्यानुसार कक्ष अधिकारी ०१ विस्तार अधिकारी (सांख्यिकी ) ०१, वरिष्ठ सहायक ०१ कनिष्ठ सहायक – ०१ वाहनचालक ०१ परिचर ०२ (विभागून), वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ०१ शाखा अभियंता ०१, पशुधन पर्यवेक्षक ०२ (विभागून) आरोग्य सहाय्यक ( पुरुष ) ०१, आरोग्य सहाय्यक (महिला) ०१, आरोग्य सेवक (महिला) ०१, औषध निर्माण अधिकारी ०१, आरोग्य पर्यवेक्षक ०१ अशा एकूण १६ कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. जिल्हा परिषदेकडून पत्रकारांना दिला जाणारा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकार पुरस्करासाठी ११ पत्रकारांची निवड केली आहे. त्यामध्ये सन २०२३ साठी तालुकास्तरावरीत ११ पुरस्कारासाठी पत्रकारांची निवड केली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू जयंतीच्या निमित्ताने पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पत्रकारांसाठी गौरवचिन्ह, रोख रक्कम देवून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हयातील खासदार व आमदार देखील उपस्थित राहणार आहेत.
राजर्षी शाहू पुरस्कारासाठी निवड झालेले कर्मचारी
संजय जाधव ( कक्ष अधिकारी, कृषी विभाग), अमोल दबडे ( विस्तार अधिकारी पंचायत समिती भुदरगड), विकास फडतारे (वरिष्ठ सहाय्यक, प्राथमिक शिक्षण विभाग), फिरोज हेतवडे (कनिष्ठ सहाय्यक, प.स.हातकणंगले), उमर मुल्ला ( वाहन चालक प्रा. आ. केंद्र टाकळी), कृष्णात पाटील (परिचर सामान्य प्रशासन विभाग), मोहन सुर्यवंशी (परिचर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग), शिल्पा गोडंगे ( आरोग्य सेवक ), जीवन बोकडे ( आरोग्य सहाय्यक), मनिषा भांडकोळी ( आरोग्य सहाय्यक), महेंद्र बामणे ( औषध निर्माता), पुष्पलता गजभिये (आरोग्य पर्यवेक्षक), मयंक कुरुंदवाडकर (कनिष्ठ अभियंता ग्रा.पा.पु. गडहिंग्लज), गीतांजली येरुडकर ( पशुधन पर्यवेक्षक, पं. स. हातकणंगले), राजू माने (पशुधन पर्यवेक्षक, प.स.करवीर), सुबराव पोवार (वरिष्ठ सहाय्यक लेखा, आरोग्य विभाग ).