वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये बुधवारी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला ‘इंडियन ऑफ द इअर’ पुरस्काराने गौरवित करण्यात आले. याप्रसंगी मणिरत्नम, जावेद अख्तर यांच्यासह नीरज चोप्रा, अंजू बॉबी जॉर्जसह अनेक व्यक्तींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शाहऊख खानने एकाच वर्षी ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डिंकी’ असे तीन एकामागोमाग एक हिट चित्रपट देऊन आपण बॉलिवूडचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. सुपरस्टारच्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम करत मोठा गल्ला जमवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाहऊख खानला वर्ष 2023 साठी ‘इंडियन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.









