वृत्तसंस्था/ लाहोर
पाक क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) माजी चेअरमन तसेच भोपाळमध्ये जन्मलेले शहरीयार खान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. इ. स. 2000 च्या दशकामध्ये भारत-पाक क्रिकेट संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी शहरीयार खान यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
शहरीयार खान हे भारताचे माजी कर्णधार दिवंगत मन्सूर अली खान पतौडी यांचे ते चुलत भाऊ होत. गेल्या काही दिवसापासून शहरीयार खान यांची प्रकृती खूपच खालावली होती. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. 1990 ते 94 या कालावधीत शहरीयार खान हे पाकचे भारतातील उच्चायुक्त तसेच ब्रिटनचे उच्चायुक्त म्हणूनही कार्यरत होते. 2003 ते 2006 या कालावधीत शहरीयार खान यांनी पीसीबीचे चेअरमन होते. 1999 च्या पाक संघाच्या भारत दौऱ्यावर ते पाक संघाचे व्यवस्थापक म्हणून चोख कामगिरी पार पाडली होती. भोपाळच्या एका श्रीमंत कुटुंबामध्ये शहरीयाचा खान यांचा जन्म झाला होता. पीसीबीने शहरीयार खान यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त केला आहे.









