वृत्तसंस्था/ कोलंबो
पाकिस्तानने जखमी असलेले गोलंदाज हॅरिस रौफ व नसीम शहा यांना बॅकअप म्हणून शाहनवाज दहानी व झमान खान या वेगवान गोलंदाजांना आशिया चष्घ्क संघात सामील केले आहे. सोमवारी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यावेळी रौफ व नसीम यांना दुखापती झाल्या होत्या.
गुरुवारी पाकची सुपर फोरमधील शेवटची लढत लंकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यापर्यंत नसीम व रौफ पूर्ण तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी असल्याने दहानी व झमान खान यांना सामील केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धा नजीक असल्याने दक्षता म्हणून त्यांना निवडण्यात आले आहे. नसीम व हॅरिस रौफ पुढील सात दिवसासाठी अनफिट ठरल्यास एसीसी तांत्रिक समितीकडे पाक संघव्यवस्थापन बदली खेळाडूंसाठी विनंती करू शकते.









