Shahid Kapoor-Kriti Sanon Movie: हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार शाहिद कपूर(Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon)यांची जोडी लवकरच एका प्रेमकथा चित्रपटात दिसणार आहे. पहिल्यांदाच शाहिद आणि क्रिती एकत्र चित्रपटात काम करत आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या या अनटोल्ड रोमँटिक चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज शनिवारी प्रदर्शित करण्यात आले.
या पोस्टरमध्ये शाहिद आणि क्रिती बाइकवर बसून रोमान्स करताना दिसत आहेत. तरणच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत आहेत. मॅडॉक चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमित जोशी आणि आराध्या या चित्रपटाचे निर्माते आहेत.
शाहिद आणि क्रितीचा पहिला चित्रपट कधी रिलीज होणार?
चाहत्यांना पहिल्यांदाच शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.या दोघांच्या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.तरण आदर्शने सांगितले की, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा हा अनटायटल्ड चित्रपट या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









