फर्स्ट लुक पोस्टर सादर
अमेझॉन प्राइम व्हिडिओची क्राइम सीरिज ‘फर्जी’नंतर शाहिद कपूर आता मोठय़ा पडद्यावर परतण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी क्रीति सेनॉनसोबतच्या त्याच्या चित्रपटाची घोषणा झाली होती. आता अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘ब्लडी डॅडी’चे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे.

शाहिदने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले असून यात त्याचा ‘ब्लडी’ लुक दिसून येत आहे. बदललेली हेअरस्टाइल अन् नाकावर जखमेची खुण, पांढऱया शर्टावर रक्ताचे डाग अशा स्वरुपात शाहिद या पोस्टरमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत डायना पेंटी, रोनित रॉय, संजय कपूर, राजीव खंडेलवाल, विवियन भाटेना हे कलाकार दिसून येणार आहेत.
फ्रेंच चित्रपटाचा हिंदी रिमके
अली अब्बास जफरसोबत शाहिदचा हा पहिलाच चित्रपट आहे. प्रेंच चित्रपट स्लीपलेस नाइटचा हा अधिकृत रिमेक आहे. 2011 मध्ये प्रदर्शित ऍक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेडरिक यार्डिन यांनी केले होते. चित्रपटाची कहाणी एका पोलीस डिटेक्टिव्हच्या अवतीभवती घुटमळणारी आहे.









