वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाक संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन शहा आफ्रिदी आणि पाकचे माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यांची कन्या अनशा यांचा विवाह कराचीतील एका मशीदीमध्ये झाला. या समारंभाला दोन्ही कुटुंबातील सदस्य तसेच पाक क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
विवाह समारंभानंतर आयोजिलेल्या स्वागत समारंभाला पाकचा कर्णधार बाबर आझम, सर्फराज अहमद, नसीम शहा, शदाब खान, पाकचा स्क्वॅशपटू जहांगीर खान, हे उपस्थित होते. 22 वर्षीय शाहीन आफ्रिदीने आतापर्यंत आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 25 कसोटी, 32 वनडे आणि 47 टी-20 सामन्यात अनुक्रमे 99, 62 आणि 58 गडी बाद केले आहेत. शाहीन आफ्रिदी आता पाक सुपर लिग क्रिकेट स्पर्धेत लाहोर क्वेलेंडर्स संघाकडून खेळणार आहे. ही स्पर्धा 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.









