मुंबई: शिवसेनेने मला ऑफर दिली होती. पण माझा ठाम निर्णय होता. पण मी शिवसेनेत जाणार नाही. मात्र या निवडणुकीत निश्चित घोडेबाजार होणार आहे. पण, घोडेबाजार करण्यासाठी माझी उमेदवारी नाही. माझी उमेदवारी सर्व पक्षांनी मला मदत करावी म्हणून होती. कारण निष्कलंक व्यक्तिमत्त्व माझं आहे हे लक्षात ठेवून मला मदत करावी अशी अपेक्षा होती. पण हे होताना मला दिसत नाही. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जात नाही. पण ही माझी माघार नसून हा माझा स्वाभिमान आहे. माझी ताकद मला कळाली आहे. स्वराज्य बांधण्यासाठी मी तयार झालोय असे स्पष्टीकरण देत राज्यकर्त्याना इशारा दिला आहे. मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेऊन छत्रपती संभाजीराजे यांनी (Sambhajiraje) आपली भूमिका जाहीर केली
संभाजीराजे पुढे म्हणाले, महाराष्ट्राताल जनतेने खुप प्रेम दिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे म्हणून त्यांनी पत्रकर परिषदेला सुरुवात केली. आपली भूमिका मांडताना ते म्हणाले, पुढचा प्रवास किती खडतर आहे याची जाणीव आहे. मी खूप काही बोलणार आहे, पण बोलायची इच्छा नाही. जे बोलायचं आहे तो माझा स्वभाव नाही. पण मला ते बोलणं गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी सोबत येऊन राज्यातील कोणत्याही शिव स्मारकाजवळ जाऊन संभाजी राजे खोटे बोलले का हे सांगावे असे राजे म्हणाले.
बैठकीत तीन मुद्द्यावर चर्चा
शिवसेनेची इच्छा होते की शिवबंधन बांधून उमेदवारी घ्यावी. पण मी स्पष्टपणे सांगितले की मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी फोन करून निमंत्रित केलं. या चर्चेत वर्षावर येऊन चर्चा करूया असे त्यांनी सांगितले. यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला मी गेलो. या बैठकीत तीन मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असे राजे म्हणाले.
म्हणून शिवबंधन नाकारले
पहिला प्रस्तावात शिवसेनेत प्रवेश करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी ही निवडणूक अपक्ष लढवणार आहे. सर्व पक्षांनी मला मदत करावी. पण शिवबंधन बांधणाच्या अटीवर त्याचक्षणी मी नाही म्हणून सांगितलं. मी त्यांना माझा प्रस्ताव सांगितला. शिवसेनेची ही जागा असल्याचे ते सांगतात. मात्र त्यांचा हा कोटा नाही. शिवसेनेच्या माध्यमातून महाविकासआघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी द्यावी अशी मागणी मी केली होती. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून उमेदवारी देऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यावर विचार करण्यासाठी मी त्यांना दोन दिवस दिले होते. त्यानंतर आपण भेटू असंही सांगितलं होतं असे राजे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पर्यायांचा ड्राफ्ट तयार झाला. त्यानुसार प्लॅनही तयार झाला. तो ड्राफ्ट आजही माझ्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. दोन मुख्य मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेटायला आले. या शिष्टमंडळात त्यांचे स्नेही, दोन खासदार हे देखील होते. या शिष्टमंडळाने सांगितले की, आज ही शिवसेनेत यावे अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. मात्र त्याच वेळी मी त्यांना हात जोडून सांगितलं माझी इच्छा नाही.
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला
शिवसेनेने आता ज्यांना उमेदवारी दिली ते कोल्हापूरचे संजय पवार तर माझा लाडका कार्यकर्ता आहे. त्याला उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी मी त्यांना फोन करून हा काय प्रकार सुरू आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री काही माझ्याशी बोलू शकले नाही. पण झालेल्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
पण आता थांबणार नाही. राज्य पिंजून काढणार. स्वराज्य बांधण्यासाठी मी तयार झालोय. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी तयार झालो आहे. माझी स्पर्धा ही माझ्यासोबत आहे. म्हणून विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करून गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी, अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी मी उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या पाठिंब्याच्या फॉर्मवर ज्या आमदारांनी सही केल्या, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या पाठीशी आयुष्यभर मी राहणार असेही ते म्हणाले.
Previous Articleअलारवाडकडून जोरदार रस्ताकाम
Next Article मणगुत्ती क्रॉसजवळ बेकायदा तांदूळ जप्त









