गुजराथी आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुबईत केले. वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. त्यांची जीभ नेहमीच घसरते यावरून अनेकदा टिका-टिप्पणी होत आहे. दरम्यान आज बंडखोर सांगोल्याचे आमदार शहाजी पाटलांनी राज्यपालांच्या विधानावर (Shahaji Patil) भाष्य केलंय. तसेच फ्रेंडशीप डे चे औचित्य साधून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले. येत्या दोन ते चार दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकार योग्य दिशेने काम करेल. राज्यपालांबाबत एखादं विधान करणं गैर आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्याला वेगळं महत्त्व असतं. बोलताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत. मुंबईबाबत त्यांचं विधान महाराष्ट्रातल्या जनतेला खटकणारं होतं. त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय. सध्याच्या परिस्थितीत जनतेचे प्रश्न सोडवणं आणि समस्येतून बाहेर काढण्यासाठी सगळ्या पक्षांनी एकजुटीनं काम करणं गरजेचं आहे.
शिवसेना वाढवावी ही भावना प्रत्येक शिवसैनिक, पदाधिकारी आणि आमदार खासदारांची आहे. एकनाथ शिंदे (EKnath shinde) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकत्र यावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








