Shahrukh Khan : अनेक दशके बॉलीवूडमध्ये रोमान्स किंग म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर शाहरुख खानला ( Shahrukh Khan ) आता अॅक्शन हिरो म्हणून बॉलीवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे आहे. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला “मला मिशन इम्पॉसिबलसारख्या ( Mission Impossible ) चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे.
शाहरुखने एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, “मी कधीही अॅक्शन फिल्म केली नाही…मी रोमँटिक, नाजूक प्रेमकथा केल्या आहेत… काही सामाजिक विषयावर देखिल चित्रपट केले आहेत. तसेच काही खलनायकाची पात्रेसुद्धा रंगवली आहेत परंतु कोणीही मला अॅक्शनसाठी कोणी घेत नव्हते. सध्या मी ५७ वर्षांचा आहे. पण पुढची काही वर्षे मला अॅक्शनपटामध्ये करायचे आहेत. मिशन इम्पॉसिबलसारखे किंवा त्याप्रकारचे चित्रपट करायचे आहेत.” असे त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
गुरुवारी शाहरुख खान मक्का ( Makka ) या पवित्र शहरात उमराह करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोमध्ये आणि व्हिडिओंमध्ये तो पांढर्या कपड्यामद्ये दिसून आला आहे. त्याने जेद्दाह (Jedah) येथील रेडसी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ( RSFF ) मध्येही हजेरी लावली.
Previous Articleसराईत राज भवार टोळीविरूद्ध मोक्का
Next Article बाळा नांदगावकरांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या









