नवीन जर्सीचे अनावरण
वृत्तसंस्था / अहमदाबाद
अदानी स्पोर्ट्स लाईनच्या मालकीच्या गुजरात जायंट्सने प्रो कब•ाr लीग (पीकेएल) चा स्टार मोहम्मदरेझा शादलोई याची संघाचा कर्णधार म्हणून घोषणा केली आणि मंगळवारी येथे त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले.
पीकेएलच्या 12 व्या आवृत्तीची सुरुवात 29 ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम येथे होत आहे. गुजरात जायंट्स दुसऱ्या दिवशी राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर यू मुम्बा विरुद्ध आपली मोहीम सुरू करतील. या हंगामात संघ 18 लीग स्टेज सामने खेळेल आणि त्यांचे लक्ष जेतेपदावर केंद्रीत असेल, असे अदानी स्पोर्ट्सलाईनने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वर्षीचा पीकेएल लिलाव जायंट्ससाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. ज्यामध्ये इराणी पॉवरहाऊस मोहम्मदरेझा शसादलोईला 2.23 कोटी रुपयांचा करारबद्ध करण्यात आला. जे पीकेएल सीझन 12 मधील सर्वोच्च बोली होती. दोनवेळा पीकेएल चॅम्पियन, एमव्हीपी आणि अनेकवेळा सर्वोत्तम डिफेंडर, शादलोई अतुलनीय बचावात्मक शक्ती आणि सिद्ध नेतृत्व क्षमता घेवून येतो, असे त्यात म्हटले आहे.
शादलोई यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आणि लीगमध्ये त्यांचा संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, असे सांगितले. पीकेएल 12 मध्ये गुजरात जायंट्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान आहे. आमच्या संघातील बहुतेक खेळाडू वीस वर्षांच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत असल्याने आम्ही एक तरुण उत्साही आणि गतिमान संघ आहोत. येणाऱ्या हंगामाबद्दल आम्ही उत्सुक आहोत आणि ही जबाबदारी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी अदानी स्पोर्ट्सलाईन आणि आमच्या प्रशिक्षकांचे आभार मानतो. आम्ही आमचे सर्वोत्तम देवू, असे नवीन कर्णधार म्हणाले. मुख्य प्रशिक्षक जयवीर शर्मा म्हणाले, की संघाचे ध्येय अहमदाबादला जेतेपदासह परतण्याचे आहे.
अदानी स्पोर्ट्स लाईनचे मुख्य व्यवसाय अधिकारी संजय अदेसरा म्हणाले, गुजरात जायंट्स त्यांचे सर्वोत्तम देईल आणि गुजरात आणि भारतातील चाहत्यांना जागतिक दर्जाचा कबड्डी अनुभव देईल. आम्ही नेहमीच प्रतिभेला उत्कृष्टतेसाठी व्यासपीठ प्रदान करण्याच्या आमच्या तत्वज्ञानाचे पालन केले आहे आणि संघाचे तरुण सरासरी वय तेच प्रतिबिंबित करते. आमच्या प्रशिक्षकांच्या सिद्ध ट्रॅक रेकॉर्डसह आमचे उद्दिष्टे स्पष्ट आहेत आणि संघ हंगामात एक मोठी कामगिरी करण्यास सज्ज आहे, अदेसरा म्हणाले.









