तापसी पन्नूचा महिला क्रिकेटपटूवर आधारित चित्रपट
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा हंगाम सुरू आहे. विशेषकरून क्रिकेटवर अनेक चित्रपट निर्माण होत आहेत. रणवीर सिंहच्या ‘83’नंतर अनुष्का शर्मा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट घेऊन येतेय. तर तापसी पन्नू देखील ‘शाबाश मिट्ठू’मध्ये दिसून येणार आहे. तापसीचा हा चित्रपट 15 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जीने केले आहे. चित्रपटात तापसी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची व्यक्तिरेखा साकारत आहे. तापसीने चित्रपटाच्या नव्या पोस्टरसह त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘एक स्वप्न आणि ते साकार करण्याचे प्लॅनिंग असणाऱया मुलीपेक्षा अधिक शक्तिशाली काहीच नाही. या ‘जेंटलमन गेम’मध्ये बॅटद्वारे स्वतःच्या स्वप्नाचा पाठलाग करणाऱया एका मुलीची ही कहाणी आहे’ असे तापसीने नमूद केले आहे. मिताली राजने 23 वर्षांच्या कारकीर्दीत 4 वेळा विश्वचषकात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तापसीने मितालीच्या मैत्रिणी आणि माजी क्रिकेटपटू नुशीन अल खादीरकडून प्रशिक्षण घेतले होते. तापसी याचबरोबर ‘जन गण मन’, ‘दोबारा’, एलियन’, ‘ब्लर’, ‘वो लडकी है कहां’ आणि ‘डंकी’ यासारख्या चित्रपटामंध्ये दिसून येणार आहे.









