सातारा :
सातारा तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा त्याच शाळेतील शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विनयभंग, पोस्को अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप लक्ष्मण केंजळे असे शिक्षकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका शाळेत पीडित मुलगी शिक्षण घेत आहे. या शाळेतील तिच्या वर्ग शिक्षक असलेल्या दिलीप केंजळे सरांनी तिला स्टाफरूममध्ये बोलवून घेतले. तिला जवळ बोलवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याची माहिती मुलीने वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिलीप विरूद्ध तक्रार दिली.
त्यानुसार विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले करत आहेत.








