पुणे / वार्ताहर :
घराशेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय मुलाला धमकावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी भादवी कलम 506 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलाच्या तक्रारीनुसार तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे 2021 ते नोव्हेंबर 2022 या दरम्यान हा प्रकार घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि तरुणी एकमेकांचे शेजारी आहेत. पीडित मुलाला तरुणीने मुलाला प्रेमाचा जाळ्यात ओढले. त्याला बलात्काराच्या खोटय़ा केसमध्ये अडकविण्याची धमकी देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच अल्पवयीन मुलाला तिच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करायला लावले. याच चित्रीकरणाच्या आधारे तरुणीने मुलावर पुन्हा दोन ते तीन वेळा अत्याचार केले. अखेर पीडित मुलाने यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीविरोधात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक एस बाबर पुढील तपास करत आहेत.