सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील गटाराच्या कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांच्या हस्ते मंगळवारी झाला. सावंतवाडी जुन्या पंचायत समितीकडून जाणाऱ्या रस्त्यावर गटाराची मजबुती करण्यासाठी साडेनऊ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तेथे गटाराचे पक्के काम करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवारी झाला. यावेळी शिवसेनेचे युवा संघटक प्रतीक बांदेकर, रमेश जाधव, ठेकेदार बिद्रे , सौरभ मठकर उपस्थित होते. या कामासाठी आमदार केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे . गटाराच्या कामामुळे या भागातील पाण्याचा निचरा होण्यास मदत मिळणार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले .









