नगरसेवक रवी साळुंखे यांची तत्परता
बेळगाव : बसवाण गल्ली, शहापूर येथील सरकारी मराठी शाळा क्र. 13 तसेच मराठी शाळा क्र. 16 व 26 येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या प्रयत्नातून कूपनलिकेची दुरुस्ती तसेच नवीन मोटार बसवून विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सरकारी शाळांमधील कूपनलिका दुरुस्तीविना बंद असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्याची मागणी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली होती. नगरसेवक रवी साळुंखे यांनी तातडीने याची दखल घेत अवघ्या दोन दिवसात शाळेसाठी नवीन मोटार देऊन स्वखर्चाने कूपनलिकेची दुरुस्ती केल्याने पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शाळेच्यावतीने रवी साळुंखे यांचे आभार मानण्यात आले.









